कुडाळ इनरव्हीलचा स्टेम युरेका मशिन्स प्रोजेक्ट कौतुकास्पद – सौ. उष्कर्षा पाटील

कणकवलीच्या आयडियल स्कुल मध्ये उभारला प्रोजेक्ट
इनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 चा सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणून इनरव्हील क्लब ऑफ कुडाळने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला स्टेम युरेका मशिन्स प्रोजेक्ट आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे कणकवली येथे यशस्वीपणे उभारला हि बाब कौतुकास्पद असून कुडाळ इनरव्हील अध्यक्षा सौ. सानिका मदने व टीमचे कौतुकही करावे तेवढे थोडेच आहे, असे गौरवोद्गार इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांनी आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे कणकवली येथे व्यक्त केले.
यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ. सानिका मदने, पीडीसी डॅा. सायली प्रभू, कुडाळ इनरव्हील सचिव सौ. सई तेली, खजिनदार सौ. गितांजली कांदळगावकर, पीडीजी रो. संग्राम पाटील, रोटरी गव्हर्नर एरिया एड डॅा. विद्याधर तायशेटे, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल अध्यक्ष ॲड राजेंद्र रावराणे, कणकवली नगरसेविका सौ. मेघा गांगण, प्राचार्य सौ. अर्चना देसाई, इनरव्हिल क्लब ऑफ साज कणकवली अध्यक्षा सौ. राजश्री रावराणे, सचिव सौ. लीना काळसेकर, सौ. प्रणाली चव्हाण, कुडाळ इनरव्हिल सदस्या सौ. प्राची तेर्से, सौ. प्राप्ती तेली, श्रीम. वैशाली कुडाळकर आदी उपस्थित होते.
STEM युरेका मशिन्स हि अटल टिंकलिंग लॅबसारखीच विकसित केलेली असून इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, इंजिनिअरिंग अशा विषयाची पायाभरणी करणारी शिक्षण क्षेत्रातील क्रांती असल्याचे मत असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांनी व्यक्त केले. जगभरातील 112 देशांनी स्टेम युरेका मशिन्स शाळांमध्ये बसविलेल्या आहेत. अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्याच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने युरेका मशिन्स काम करते. यामध्ये थ्रीडी प्रिंटर असून विविध साहित्य या मशिन्स सोबत उपलब्ध होतात.
इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ ला स्टेम युरेका मशिन्स प्रोजेक्ट आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे कणकवली येथे उभारण्याची संधी दिल्याबद्दल व भरीव योगदान दिल्याबद्दल आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडेचे संस्थापक डॉ. विद्याधर तायशेटे यांचे व डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. उत्कर्षा पाटील व पीडीजी रो. संग्राम पाटील यांचे धन्यवाद व्यक्त करते असे भावोद्गार इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ. सानिका मदने यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक डॅा. विद्याधर तायशेटे यांनी केले, सूत्रसंचालन सौ. शीतल बांदल तर आभार प्राचार्या सौ. अर्चना देसाई यांनी केले.





