बिबवणेतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

५८ वेळा रक्तदान करणाऱ्या प्रसाद निर्गुण यांचा सत्कार

पंचायत राज अभियाना अंतर्गत बिबवणे ग्रामपंचायत, स्वराज मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुण ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तब्बल ५८ वेळा रक्तदान करणारे स्वराज मित्रमंडळाचे कार्यकर्ते प्रसाद निर्गुण यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बिबवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.1 येथे सदर शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा माजी मुख्याध्यापक प्रकाश कुबल, सरपंच सृष्टी कुडपकर, ग्रामपंचायत सदस्या आर्या मार्गी, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर लुडबे, सिधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सिधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे (कुडाळ वेंगुर्ले विभाग संघटक) यशवंत गावडे, जि. प. प्राथमिक शाळा क्र.1 चे शिक्षक एकनाथ कुर्लेकर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या सीएचओ शलाका चव्हाण, एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटलच्या रक्तपेढी विभागाचे तंत्रज्ञ मनीष यादव उपस्थित होते.
श्री कुबल म्हणाले, बिबवणे गावातील तरुणांनी समाजसेवेचा वसा मोठ्या जबादारीने पार पाडला आहे. रक्तदानासारखे खूप चांगले कार्य ग्रामपंचायत, स्वराज्य मंडळ व ग्रामस्थांनी हाती घेतले आहे. रक्तदानाबरोबरच अन्य सामाजिक किंवा धार्मिक कार्यात हे तरुण पुढे असतात, असे त्यांनी सांगून या त्यांच्या समाजसेवेची प्रचिती कोरोना काळात आली. कोरोना बाधित कुटुंबाच्या मदतीला या गावातील तरुण धाडसाने पुढे आले, याची आठवण त्यांनी करून दिली.
श्री. तेंडोलकर म्हणाले, रक्तदान हे जीवनदान असून एक रक्तदाता आपल्या एका रक्तदानाने तीन जणांचे प्राण वाचवित असतो. आज अपघात, विविध शस्त्रक्रिया, प्रसुती, रक्ताक्षय तसेच थॅलेसेमियाग्रस्त मुलांना जीवनदान देण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य रक्तदाते करीत असतात. आपल्या जिल्ह्यातील रक्तदाते स्वयंस्फुर्तपणे रक्तदानासाठी पुढे येतात. बिबवणे गावातील अनेक रक्तदाते तातडीच्यावेळी रक्तदानासाठी पुढे येऊन रक्तदान करतात, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
लाईफटाइम हॉस्पिटल रक्तपेढीचे डॉ गणेश जायभाये , मनिष यादव, चेतन सावंत, अमृता आचरेकर , वनिता जंगले व गौरवी चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
माजी सरपंच यशवंत ( दादा) चव्हाण, पोलीस पाटील शैलेश राऊळ, सोमनाथ वेंगुर्लेकर , ग्रा. पं. माजी सदस्य दादा नाईक, पप्पू वेंगुर्लेकर ,प्रसाद निर्गुण, प्रसाद नाईक, छायाचित्रकार सूरज कुडपकर, बिबवणे हायस्कूलचे लिपिक गिरीश राऊळ, राजन नागवेकर, अभिषेक वेंगुर्लेकर , प्राथमिक शिक्षक समीर राऊळ व रुपेश वालावलकर , धोंडी गावडे, महेश वारंग, नीलेश मार्गी, शार्दूल शिरोडकर, दत्ताराम उर्फ नीलेश वेंगुर्लेकर , सतीश देऊलकर, आनंद बिबवणेकर, महेश बिबवणेकर ,पिट्या कुडपकर, रोहन नाईक , सिद्धेश सामंत,गणपत जेठे, ओंकार रमाकांत सावंत, अभिषेक गावडे, आशा सेविका रुची लाड , ग्रा. पं. कर्मचारी संदेश नाईक आदी उपस्थित होते.
या कार्यक्रम दरम्यान, स्वराज मित्रमंडळाचे कार्यकर्ते व ओ – निगेटिव्ह रक्तदाता प्रसाद निर्गुण यांनी आतापर्यंत तब्बल 58 वेळा रक्तदान केले. त्यांचा हा रक्तगट दुर्मिळ आहे. त्यामुळे या रक्तगटाची कुणा रुग्णाला गरज भासल्यास त्यांना फोन आला की, ते रक्तपेढीत तात्काळ उपस्थित राहतात. या गावातील सर्वाधिक वेळा रक्तदान करणारा रक्तदाता म्हणून श्री. निर्गुण यांचा श्री .कुबल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!