कुडाळदेशकर आद्य गौड ब्रह्मण समाजसेवा मंडळाची 11 जानेवारी रोजी विशेष सभा

पूर्णानंद भवन तृतीय वर्धापन दिन सोहळ्याचे करण्यात येणार नियोजन

मंडळ पदाधिकारी, सदस्य व समाजातील कार्यकर्त्यांनी ही उपस्थित राहण्याचे आवाहन

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळ कणकवली ची विशेष सभा 11 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता पूर्णानंद भवन फोंडाघाट या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुरेश सामंत व कार्यवाहक कमलाकर महाजन यांनी केले आहे. 28 जानेवारी रोजी पूर्णानंद भवना च्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. या सभेला मंडळाचे पदाधिकारी सदस्य यांच्यासहित समाजातील काम करणारे कार्यकर्ते यांनी देखील या वर्धापन दिन सोहळा रुपरेषा व नियोजन यासाठी उपस्थित राहून सूचना व सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!