संत रविदास यांचे विचार आत्मसात करा – मधुकर जाधव

संत रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न
संत रविदास यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करून वाटचाल केली पाहिजे. समाज संघटित होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आपल्या समाजाची तरुण पिढी ही समाजाच्या प्रवाहात आली पाहिजे, असे प्रतिपादन कवी समाजभूषण पुरस्कार प्राप्त मधुकर जाधव यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग तालुका शाखा कुडाळ यांच्यावतीने सन 2026 च्या संत रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा येथील मराठा समाजाच्या सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन कवी मधुकर जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजाचे जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, दिनदर्शिका प्रकाशन समिती प्रमुख श्रीराम चव्हाण, तालुका उपाध्यक्ष मनीषा पाताडे, तालुका सचिव नरेंद्रकुमार चव्हाण, जिल्हा कार्यकारणी सदस्य के टी चव्हाण, मनोहर सरमळकर, प्रमोद आजगावकर, मधुकर चव्हाण, रामदास चव्हाण, नितीन बाबर्डेकर, वासुदेव कसालकर, मधुकर जाधव, संतोष पावस्कर, गणपत चव्हाण, दत्ताराम कसालकर, राजेश चव्हाण, सिद्धेश खेडेकर, स्वप्निल म्हापणकर, आनंद चव्हाण, रमेश कुडाळकर, समाजाचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले, आपला समाजाच्या सर्वागीण विकासासाठी सर्वांनी एकत्र झाले पाहिजे. विशेष म्हणजे सकारात्मक दूरदृष्टीकोन ठेवून आपल्यासारख्या समाजाच्या ज्येष्ठांनी आपल्या तरुण पिढीला समाजाचे समाजाचे महत्व पटवून दिले पाहिजे. समाज अधिक संघटित कसा होईल यासाठी काम करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी समाजाच्या विकासात तरुणांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. आजची तरुण पिढी आपल्या समाजाबरोबरच देशाचे भवितव्य आहे असे सांगितले. श्रीराम चव्हाण , चंद्रसेन पाताडे मनिषा पाताडे यांनी संत रविदास दिनदर्शिका सोहळा अतिशय सुंदररित्या करण्यात आला. आपले संत रविदास हे महाविभूती आहेत. त्यांचे महान कार्य सर्व समाजापर्यंत पोचले पाहिजे, असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संत रविदास रत्न पुरस्कार प्राप्त कवी मधुकर जाधव यांचा कुडाळ तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार सचिव नरेंद्रकुमार चव्हाण यांनी मानले.





