पाट हायस्कूलच्या कलाकारांचे कौतूक

कलाविषयक विविध उपक्रमांचा पारितोषिक वितरण समारंभ पाट हायस्कूल मध्ये उत्साहात संपन्न झाला.
कै. मा. एकनाथजी ठाकूर कलाकादमी मार्फत विविध कलाविषयक उपक्रम वर्षभर राबविले जातात. यामध्ये शुभेच्छा कार्ड, वारली पेंटिंग, आकाश कंदील तयार करणे असे उपक्रम दिवाळीनंतर घेण्यात आले होते. या उपक्रमामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण मुख्याध्यापक आणि संस्था संचालक यांच्या हस्ते संपन्न झाले.
या उपक्रमात तयार झालेल्या विविध कलात्मक वस्तूंचा वापर शाळेच्या सजावटीसाठी करण्यात आला होता. इयत्ता पाचवी ते आठवी मधील ३७० विद्यार्थ्यांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता. वारली चित्रणातून आपल्या संस्कृतीची ओळख तर आकाश कंदील तयार करणे, शुभेच्छा कार्ड तयार करणे या उपक्रमामधून आपल्या उत्सवांचे महत्त्व मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम या उपक्रमातून साध्य होते. कला विषयक उपक्रमातून नवनवीन कल्पना मुलांना अजमावता येतात. आजच्या मोबाईलच्या जमान्यात मुलांच्या हातांना वळण ठेवण्यासाठी असे उपक्रम घेणे गरजेचे आहे. हाच उद्देश कै. माननीय एकनाथजी ठाकूर कला अकादमी तर्फे राबविला जातो. त्यामुळे कलाविषयक विविध क्षेत्रात या मुलांची चमक दिसते.
शुभेच्छा कार्ड बनवणे मध्ये प्रथम क्रमांक ऋता मार्गी, द्वितीय क्रमांक कामिनी कुंभार, तृतीय क्रमांक उत्कर्षा केरकर, उत्तेजनार्थ वैष्णवी चव्हाण, हर्षिता ताम्हाणेकर आणि ध्रुव भगत. वारली पेंटिंग मध्ये योगिनी खोर्जुवेकर प्रथम, खुशी कृष्णा कोचरेकर द्वितीय, पूर्वा प्रकाश मुननकर तृतीय, उत्तेजनार्थ धनीशा परब, अंतरा दुतोंडकर आणि दूर्वा म्हैसकर.
आकाश कंदील बनवणे यामध्ये मयुरी धुरी प्रथम, नाविन्या निवतकर द्वितीय आणि विजय घारे तृतीय असे क्रमांक प्राप्त केले.
या कार्यक्रमांमध्ये संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी विजय मिस्त्री, कला शिक्षक संदीप साळसकर, दिपीका सामंत, दतात्रय कुबल, तनुजा कुमठेकर आणि इतर शिक्षक उपस्थित होते.
संस्था आणि विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. कै. शकुंतला दत्तात्रय नागोळकर, कोचऱे यांच्या स्मरणार्थ नातू सम्राट तुळशीदास कुडतरकर यांच्या तर्फे यशस्वी विद्यार्थांना रंगसाहित्य देण्यात आले .

error: Content is protected !!