न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

“तिमिरातून तेजाकडे” या संस्थेचे संस्थापक श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे स्पर्धा परीक्षांबाबत मोफत मार्गदर्शन सत्र न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन सत्रामध्ये स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी कशी करावी, अभ्यासाचे योग्य नियोजन, उद्दिष्ट निश्चिती, योग्य दिशा व सातत्य याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. श्री. सत्यवान रेडकर यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा व आत्मविश्वास मिळणार असून, भविष्यातील करिअर घडवण्यासाठी हे सत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमास शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई कमिटी एपीए अध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष श्री. प्रदीप परब मिराशी, स्थानिक कमिटी अध्यक्ष श्री. जे. एम. फर्नांडिस व सर्व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंकुश घुटूकडे यांच्याकडून करण्यात आले आहे.





