राष्टीय लोक अदालतीत कुडाळ मध्ये ४८ प्रकरणे तडजोडीने निकाली

१९.८२ लाखांची वसुली
कुडाळ येथील राष्टीय लोक अदालतीत एकूण ४८ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली असून १९,८२,०९४/- एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.
कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजीत राष्टीय लोकअदालतीचे उदघाटन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अघ्यक्ष तथा कुडाळचे दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी दिवाणी न्यायालयाचे अतिरीक्त दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. जी. कुंभार तसेच वकील श्रीमती आर.पी.नाईक , सहा. सरकारी वकील श्रीमती अमृता मिरजे व श्रीमती स्वाती पाटील तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
या राष्टीय लोक अदालीतीचे दोन पॅनेलमध्ये काम चालले पॅनल प्रमुख म्हणून जी. ए .कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश कुडाळ व श्रीमती आर. जी. कुंभार, अतिरीक्त दिवाणी न्यायाधीश कुडाळ यांनी काम पाहिले. पॅनल सदस्य वकील श्रीमती आर. पी. नाईक यांनी काम पाहिले. या राष्टीय लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी स्वरुपात १३२ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४० प्रकरणे निकाली झली तसेच वादपूर्व ९१९ प्रकरणांपैकी ८ प्रकरणे निकाली झाली. एकूण १०५१ प्रकरणांपैकी ४८ प्रकरणे निकाली निघून १९,८२,०९४/-एवढया रक्कमेची वसूली करण्यात आली.
सदर राष्टीय लोकअदालीत यशस्वी करणेसाठी बँक ऑफ इंडीया, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बॅंक, महाराष्ट ग्रामीण बॅंक, कॅनरा बॅंक, सेंटल बॅंक चे शाखाधिकारी तसेच विज वितरण कंपनी यांचे लेखापाल उपस्थित होते. सदर राष्ट्रीय लोकअदालतीचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी न्यायालयाचे सहायक अधिक्षक सी. एस. नाईक तसेच न्यायालयाचे कर्मचारी एल. डी. सावंत, लघुलेखक, व्ही. बी. गुरव, लघुलेखक, आर. टी. आरेकर, वरीष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक अे. अे. परब, आर. आर. राणे, श्रीमती एस. एस. बालम, एच. ए. कारेकर, श्रीमती पी. डी. केळूसकर, श्री. व्ही. पोम्बरेकर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री. करंगुटकर, श्री. चव्हाण व श्री. रेडकर यांनी परीश्रम घेतले.





