पावशी येथे कार – दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ – पावशी येथे काल दुपारी ३.३० वा. च्या सुमारास रेनॉल्ड कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या भरधाव एक्टिवा दुचाकीची पुढे जाणाऱ्या रेनॉल्ड कारला मागून धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी कुडाळ रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.





