ई’ कचऱ्यातून जि. प. शाळेला मिळाला ‘संगणक

नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडी आणि इकोव्हीजन संस्थेचा स्तुत्य उपक्रम
‘पुर्णम इकोव्हिजन’ या स्वयंसेवी संस्थेने मागील दोन वर्षांपासून राबवलेल्या ई-कचरा संकलन मोहिमेमुळे शाळेला ई-कचऱ्यापासून तयार केलेला संगणक (Re-used/Refurbished Computer) जिल्हा परिषद शाळा चिंदर सडेवाडीला मुख्याध्यापक शुभांगी लोकरे-खोत यांच्या उपस्थितीत भेट म्हणून देण्यात आला.
गेली दोन वर्षे, ‘पुर्णम इकोव्हिजन’ संस्थेने स्थानिक नाथ गोसावी युवक मंडळाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात ई-कचरा (Electronic Waste) गोळा केला होता. दरवर्षी २६ जानेवारीच्या निमित्ताने हा ई-कचरा योग्य प्रक्रियेसाठी दिला जातो.
याच सहकार्याच्या बदल्यात, ‘पुर्णम इकोव्हिजन’ संस्थेने संकलित केलेल्या ई-कचऱ्याचा वापर करून तयार केलेला एक संगणक आज शाळेला देण्यात आला. ई-कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनातून एक उपयुक्त वस्तू निर्माण करण्याची आणि ती शाळेसाठी उपलब्ध करून देण्याची ही संकल्पना अत्यंत कौतुकास्पद आहे.
यावेळी मंगेश गोसावी, शंकर गोसावी, स्वप्नील गोसावी
दिलीप गोसावी, सुहासिनी गोसावी आदी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीने या सहकार्याबद्दल ‘पुर्णम इकोव्हिजन’ आणि ‘नाथ गोसावी युवक मंडळाचे’ आभार मानले आहेत.
पर्यावरण रक्षणाचे आणि तंत्रज्ञान शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.





