कुडाळ पोलीस ठाण्याचा एस.पी.कडून गौरव

यशस्वी गुन्हे तपास आणि आयएसओ मानांकन कामगिरी

संवेदनशील व गंभीर गुन्हयाचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल तसेच कुडाळ पोलीस ठाण्यात I.S.O. मानांकन प्राप्त झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.
याबाबत परिसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, दि. 02/08/2025 रोजी कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात आरोपीने अपहरण केलेबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचे अन्वेषण चालू असताना सदरचा गुन्हा हा आरोपी कुणाल कृष्णा कुंभार (वय 23 वर्षे, रा. गोठोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी स्वतःकडे घेतला. दि. 30/09/2025 रोजी आरोपीस अटक करुन तपास केल्यानंतर आरोपीने गुन्हयातील पिडित मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या करुन पुरावा नष्ट करण्यासाठी लपवून ठेवलेले प्रेत कौशल्यपूर्वक निष्पन्न करुन भक्कम पुरावे हस्तगत करण्यात आले. या गुन्हयाचा तपास पो. नि. राजेंद्र मगदूम, पो.उ.नि. अनिरुद्ध सावर्डे, पो.हे.कॉ. कृष्णा केसरकर, पो.हे.कॉ. संजय कदम, पो.हे.कॉ. कृष्णा परुळेकर, पो.हे.कॉ. प्रमोद काळसेकर, पो.हे.कॉ. योगेश वेंगुर्लेकर, पो.हे.कॉ. सखाराम भोई, पो.हे.कॉ. आनंद पालव, पो.हे.कॉ. महेश भोई, पो.हे.कॉ. समीर बांदेकर, पो.हे.कॉ. हरेश पाटील, पो.हे.कॉ. महेश जळवी, पो.ना. रुपेश गुरव, पो.कॉ. नितीन शेडगे, पो.कॉ. विष्णू रामदास, म.पो.कॉ. प्रणाली रासम यांनी केलेला आहे.
तसेच, मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राज्यभरात राबविण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेल्या कार्यवाहीचे मुल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये कुडाळ पोलीस स्टेशनला A + गुणवत्ता मानांकन प्राप्त झालेले आहेत.
उपरोक्त दोन्ही उल्लेखनीय कामगिरीसाठी उपरोक्त नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे डॉ. मोहन दहीकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व श्रीमती नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी बुधवार दि. 10/12/2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग येथे मासिक गुन्हे सभेमध्ये जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी यांचे उपस्थितीत प्रशंसापत्र सन्मान केला आहे.

error: Content is protected !!