पोईप कॉलेजमधील विद्यार्थी राज सुधाकर गोसावी यांचा प्रामाणिक पणा

राठिवडे येथील महिलेचे हरवलेले पाकीट केले परत
मालवण आगाराचे पोईप येथील एस टी चालक सुधाकर गोसावी यांचा मुलगा राज सुधाकर गोसावी याचा असाही प्रामाणिक पणा
: पोईप येथील एस टी चालक सुधाकर गोसावी यांचा मुलगा राज सुधाकर गोसावी याला दहा दिवसांपूर्वी त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर एका अज्ञाताचे पेसै असलेले पाकिट सापडले होते. मात्र त्यापाकिटामध्ये कोणताही पूरावा न आढळल्यामुळे ते पाकिट कोणाचे हे समजणे कठीण झाले होते. अखेर पोईप येथील रिक्षा चालक महेश पालव याना याविषयीची खबर लागताच त्यानी राज गोसावी याना भेटून या पाकिटावर माहिती घेतली व पाकिट उघडून पाहीले असता सोनवडेकर आडनावाचा कागद मिळाला त्यावरून महेश पालव यांनी हे पाकिट राठिवडे येथील सोनवडेकर असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला असता सदरचे पाकिट माझेच पडले होते असे राधा नंदकिशोर सोनवडेकर सांगितले. तब्बल चार दिवसांनंतर आज रोख रक्कम अकरा हजार पाचशे रुपये असलेले पाकिट राज गोसावी यानी राधा नंदकिशोर सोनवडेकर यांना सूपूर्द केले आहे. राज गोसावी या कॉलेज युवकांच्या प्रामाणिकपणा बद्दल पोईप पंचक्रोशीतील जनतेत कौतुक व अभिनंदन होत आहे.
राज गोसावी या कॉलेज युवकाने आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. यावेळी संपदा गोसावी, प्रविण पांचाळ, सागर सोनवडेकर, राधा नंदकिशोर सोनवडेकर इत्यादी उपस्थित होते.





