अबीद नाईक यांच्या पाठीशी राज्यातील नेत्यांची ताकद

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून अबिद नाईक यांच्या कामाचे कौतुक
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली अबीद नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक प्रभागात प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती असल्याने प्रभाग क्रमांक 17 या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार अबीद नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा राष्ट्रवादी युतीचे प्रभाग क्रमांक 17 चे उमेदवार अबीद नाईक ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , माजी नगरसेवक बाबू गायकवाड, शिवसुंदर उर्फ गजा देसाई, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





