कणकवली नगरपंचायत चे कर्मचारी अमोल भोगले यांना पितृशोक

महसूल चे सेवानिवृत्त कर्मचारी बाळकृष्ण भोगले यांचे निधन
कणकवली तालुक्यातील हळवल येथील रहिवासी बाळकृष्ण भोगले(वय 80)यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. कणकवली नगरपरिषदेच्या नागरी आजिविका विभागाचे (N.U.L.M.) सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले यांचे ते वडील होत.
श्री.बाळकृष्ण भोगले हे महसूल विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी पुरवठा विभागात बरीच वषेँ सेवा केली. आज सकाळी त्यांनी अस्वस्थ वाटू लागल्याने स्थानिक डॉक्टरां यांचे कडे नेले. तेथून घरी येऊन रुग्णालयात नेत असतांनाच त्यांचे निधन झाले.
संकल्प प्रतिष्ठानचे सचिव, गोपुरी आश्रमचे संचालक तथा कणकवली नगरपरिषदेचे अधिकारी अमोल भोगले यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन विवाहित मुली, विवाहित मुलगा,सून, नातवंडे असा परिवार आहे.





