माजी आमदार मौनीबाबा वैभव नाईक गप्प का?

पालकमंत्री नितेश राणे यांचा सवाल

मालवण मध्ये एक तर कणकवलीत वेगळी भूमिका

मालवण मधील भाजपच्या सर्वच उमेदवारांना प्रचारात चांगला प्रतिसाद

पालकमंत्री नितेश राणे यांनी ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला. कणकवलीत ठाकरेसेना व शिंदे शिवसेना एकत्र येते. मात्र मालवण मध्ये मौनीबाबा वैभव नाईक तसे न करता ठाकरे सेनेच्या पारंपरिक मतदारांना फसवून एक प्रकारे मॅच फिक्सिंग करतं आहेत. उबाठा मतदारांची दिशाभूल न करता वैभव नाईक यांनी भुमिका स्पष्ट करावी. अशी रोखठोक भुमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्टपणे मांडली.
दरम्यान, भाजपचे सर्व उमेदवार कमळ या निशाणीवर विजयी होतील. भाजपा विकास आणि राष्ट्रीयत्व या मुद्द्यावर ठाम आहे. जनतेचाही मोठा पाठिंबा भाजपाच्या सर्वच उमेदवारांना मिळत आहे. असेही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपाच्या मालवण नगराध्यक्ष उमेदवार सौ शिल्पा यातील खोत यांच्याही सामाजिक कार्याचे व त्यांना मालवण शहरात सर्वच प्रभागात मिळत असलेल्या प्रतिसादाचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.
भाजपा मालवण कार्यालय येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेतून विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, निवडणूक प्रभारी रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये, महानंदा खानोलकर, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, अन्वेशा आचरेकर, संमेश परब यांसह पदाधिकारी, भाजपा उमेदवार उपस्थित होते.
मालवण नगरपरिषद निवडणूक भाजपा विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. नागरिकांना सर्व सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत. अठरा प्रकारच्या नागरी सुविधा त्यांना उपलब्ध करून देणे हे आमचं कर्तव्य राहील. मालवण शहराचा सर्वांगीण आणि गतिमान विकास हाच मुद्दा घेऊन भाजपाचे सर्व उमेदवार निवडणुकीच्या निमित्ताने घरोघर प्रचार करत आहेत. त्यांना सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
राणेसाहेबांनी मालवण शहर हे पर्यटनाचे मॉडेल बनवले. जिल्ह्यातील अन्य तालुक्यात पर्यटन विकास होत असताना मालवणचाच आदर्श घेऊन त्या ठिकाणी विकासाच्या संकल्पना राबवल्या जातात. भविष्यात मालवण शहरातही मोठ्या प्रमाणात नवीन पर्यटन प्रकल्प विकासाच्या नव्या संकल्पना राबवल्या जातील असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
आमच्या मच्छीमार बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतले जात आहेत. सोबतच परप्रांतीय व अनधिकृत मासेमारी विरोधात कठोर कारवाई सातत्याने केली जात आहे मोठ्या प्रमाणात कारवाई होत असताना या कारवाईला अधिक बळ मिळावे यासाठी आधुनिक स्वरूपातील पाच स्टीलच्या गस्ती नौका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत वेगवान स्वरूपातील या गस्ती नौकांच्या माध्यमातून परप्रांतीय अनधिकृत मासेमारीवर लक्ष ठेवले जाणार आहे. आमच्या मच्छीमार बांधवांना कोणताही त्रास होऊ नये त्यांना अधिकाधिक सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजपाच्या नगराध्यक्ष उमेदवार सौ शिल्पा येथील खोत यांच्या सामाजिक कार्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष कौतुक केले. शिल्पा खोत यांच्यासह भाजपच्या सर्वच उमेदवारांना सर्व प्रभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे दोन तारीखला मतदानातून सुज्ञ मतदार सर्व काही स्पष्ट करतील. असे पालकमंत्री नितेश राणे यांनी विश्वासपूर्वक स्पष्ट केले.

error: Content is protected !!