शिवप्रेमीनी किल्ले भगवंतगड येथे राबवली स्वच्छता मोहीम

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचा अभिनव उपक्रम
जागतिक वारसा सप्ताह दरवर्षी १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे सदस्य व शिवप्रेमीनी चिंदर येथील किल्ले भगवंतगडावर आज स्वच्छता मोहीम राबवत एक अभिनव उपक्रम राबवला.
लोकांना सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे महत्त्व समजणे त्यांचे संरक्षण करणे तसेच भावी पिढ्यांसाठी हा वारसा जतन करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष वरद जोशी यांनी सांगितले. या स्वच्छता मोहीमेत प्रथमेश चव्हाण, सोहम घाडीगांवकर, राजन पालकर, स्वप्निल शिर्सेकर, आकाश मेस्त्री, नारायण पाताडे आदी शिवप्रेमी सहभागी झाले होते.





