अर्थ साक्षरतेच्या दिशेने पहिले पाऊल!

युरोपीयन इंटरनॅशनल युनिवर्सिटी पॅरिस विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
भिरवंडे गावच्या सुकन्या असलेल्या सानिका सावंत आणि रुचिरा सावंत यांच्यामार्फत आयोजन
जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत कौशल्यांपैकी एक कौशल्य म्हणजे अर्थ साक्षरता. आपली आर्थिक गणितं सांभाळता येणारी, पैशाचे महत्व माहित असणारी व पैशांचा आदर करणारी, त्यांची योग्य पद्धतीने जपणूक करणारी पुढील पिढी तयार करणे हे विकसित देश म्हणून घडत असताना अत्यंत आवश्यक कौशल्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुद्धा याचा पुरस्कार करते आणि विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच अर्थ साक्षर करण्यासाठी प्रोत्साहन देते. हे कौशल्य हे केवळ एका वयापुरते, प्रांतापुरते किंवा क्षेत्रापुरते मर्यादित नसून ते एकूणच सर्वांसाठी महत्वाचे आहे हे ध्यानात घेऊन ‘Financial Freedom Movement’ हा उपक्रमाचे आयोजन ग्रोथ बफे पार्टनर्स आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ग्लोबल शेपर्स ठाणे हब मंच यांच्या वतीने कोकण विभागात पहिल्या टप्प्यात करण्यात आले.
भिरवंडे गावच्या सुकन्या असलेल्या सानिका सावंत आणि रुचिरा सावंत या आयोजक तर मनस्वी पेंढारी
हर्षिता जोशी मानिनी बाईत यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
इयत्ता पाचवी पासून पुढे विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्प्या भाषेत, त्यांच्या अवती भवतीच्या उदाहरणांचा, दैनंदिन जीवनातील घटकांचा, सवयीचा दाखल देत पैसे म्हणजे काय ते गुंतवणुकीचे योग्य मार्ग कोणते इथपर्यंत अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या आहेत. हा अभ्यासक्रम वॉरन बफे यांच्या भारतातील मॅनेजर्स पैकी एक डॉ प्रकाश जैन यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनांतर्गत तयार केला आहे. बफे ग्रोथ पार्टनर्स या कंपनी मार्फत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल शेपर्स ठाणे यांच्या जोडीने हा उपक्रम राबवला जातो आहे. युरोपियन इंटरनॅशन युनिव्हर्सिटी पॅरिस या प्रतिष्ठित आतंरराष्ट्रीय विद्यापिठाकडून हा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहे. सदर अभ्यासक्रम सशुल्क उपलब्ध असला तरी सध्या ‘Financial Freedom Movement’ अंतर्गत काही शिक्षण संस्थांमध्ये आपण तो मोफत राबवित आहोत. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास ५००० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे दिनांक १० नोव्हेंबर पासून कोकण भागातील ३००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे, नरडवे इंग्लिश हायस्कूल, नरडवे माध्यमिक विद्यामंदिर कनेडी त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे सौ. इंदिराबाई दत्तात्रेय वर्दम हायस्कूल, पोइप आयडियल इंग्लिश स्कूल, कणकवली माध्यमिक विद्यालय, उंबरडे . न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, फोंडाघाट बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली प्रगत विद्यामंदिर, रामगड छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकलचर ओरोस आदी शाळा कॉलेज मध्ये आयोजन करण्यात आले त्यांच्या या उपक्रमाबद्धल सर्व शाळा व संस्थानी समाधान व्यक्त करण्यात आले.





