भाजपाकडून आतापर्यंत घेतलेल्या 3 हरकतींवर निर्णय राखून ठेवला

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दोन तासांचा अवधी

काय निर्णय येणार त्याकडे सर्वांचे लक्ष

नगराध्यक्ष उमेदवार समीर नलावडे यांच्यावर संदेश पारकर यांनी घेतलेला आक्षेप फेटाळला

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रियेमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये कणकवली शहर विकास पॅनलचे क्रांतिकारी विचार पक्षाचे उमेदवार सुमित राणे यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेले शपथ पत्र च्या मुद्द्यावरून प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार स्वप्नील राणे यांनी छाननी दरम्यान हरकत घेतली आहे. तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये स्नेहा वाळके यांच्या विरोधात मेघा गांगण यांनी छाननी दरम्यान हरकत घेतली आहे. तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये सुमेधा अंधारी यांच्या विरोधात स्नेहा अंधारी यांनी उमेदवारी अर्जावर छाननी दरम्यान आक्षेप नोंदवला. या तीनही आक्षेपांवर निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. भाजपाच्या वतीने यावेळी ॲड. राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला. तर कणकवली शहर विकास आघाडी पॅनलचे क्रांतिकारी विकास पक्षाचे उमेदवार यांच्या वतीने ॲड. गणेश पारकर यांनी युक्तिवाद केला. त्यामुळे या प्रभागामधील छाननी बाबत काय निर्णय येतो ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!