भाजपा कडून कणकवली नगरपंचायत निवडणुकीत घेतलेल्या सर्व हरकती फेटाळल्या

नगराध्यक्ष पदाकरता संदेश पारकर यांच्याकडून घेतलेली हरकत देखील फेटाळली

शहर विकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज वैध ठरल्यानंतर जल्लोष

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपा कडून आतापर्यंत 3 हरकती घेतल्यानंतर या तीनही हरकतींचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. यामध्ये प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक सहा या तीन ठिकाणी घेतलेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळत सर्वच नामनिर्देशन पत्र वैध ठरवली आहेत. त्यामुळे कणकवली शहर विकास आघाडीतील क्रांतिकारी विकास पक्षाचे सर्वच उमेदवार वैध ठरले आहेत.
शहर विकास आघाडीच्या पॅनल कडून या पॅनलचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या नामनिर्देशन पत्रावर हरकत घेतली होती. ती फेटाळण्यात आली. तर 16 क्रमांकाच्या प्रभागांमध्ये भाजपाचे संजय कामतेकर यांनी प्रतिस्पर्धी शहर विकास आघाडीचे उमेदवार उमेश वाळके यांच्यावर हरकत घेतली होती. ही हरकत देखील छाननी वेळीच फेटाळण्यात आली. त्यामुळे क्रांतिकारी विकास पक्षाच्या सर्व उमेदवारांचे तसेच भाजपाच्या सर्वच उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननी मध्ये वैध ठरले आहेत.

error: Content is protected !!