कणकवली नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधील शहर विकास आघाडीच्या उमेदवारावर देखील भाजपकडून हरकत

शहर विकास आघाडी पॅनलचे उमेदवार स्नेहा वाळके यांच्यावर भाजपाच्या उमेदवार मेघा गांगण यांच्याकडून हरकत

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दोन तासाचा वेळ

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रियेमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये कणकवली शहर विकास पॅनलचे क्रांतिकारी विचार पक्षाचे उमेदवार स्नेहा वाळके यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेले शपथ पत्र च्या मुद्द्यावरून प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार मेघा गांगण यांनी छाननी दरम्यान हरकत घेतली आहे. मेघा गांगण यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला. तर स्नेहा वाळके यांच्या वतीने ॲड. गणेश पारकर यांनी युक्तिवाद केला. या हरकतीवरचा निर्णय दोन तासात तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी राखून ठेवला असून, दोन तासांमध्ये हा निर्णय येणार असल्याची माहिती वकिलांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रभागामधील छाननी बाबत काय निर्णय येतो ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!