कणकवली नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधील हरकतीवरील निर्णय राखून ठेवला

शहर विकास आघाडी पॅनलचे उमेदवार सुमित राणे यांच्यावर भाजपाचे उमेदवार स्वप्निल राणे यांच्याकडून हरकत

प्रभाग क्रमांक 3 वर काय निर्णय येतो त्याकडे सर्वांचे लक्ष

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रियेमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये कणकवली शहर विकास पॅनलचे क्रांतिकारी विचार पक्षाचे उमेदवार सुमित राणे यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेले शपथ पत्र च्या मुद्द्यावरून प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार स्वप्नील राणे यांनी छाननी दरम्यान हरकत घेतली आहे. स्वप्निल राणे यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला. तर सुमित राणे यांच्या वतीने ॲड. गणेश पारकर यांनी युक्तिवाद केला. या हरकतीवरचा निर्णय दोन तासात तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी राखून ठेवला असून, दोन तासांमध्ये हा निर्णय येणार असल्याची माहिती वकिलांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रभागामधील छाननी बाबत काय निर्णय येतो ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!