कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी सुरू

दोन्ही बाजूचे पदाधिकारी, कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात हजर
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांपासून सुरुवात
कणकवली नगरपंचायत निवडणुकी चे काल दाखल झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी 6 व नगरसेवक पदासाठी 56 उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी आज कणकवली तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आली आहे. 11 वाजल्यापासून ही छाननीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याकरता भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, क्रांतिकारी विचार पक्षाचे कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, लोकराज्य जनता पार्टी चे नगराध्यक्षाचे उमेदवार गणेश प्रसाद पारकर यांच्या सहित कणकवली शहर विकास आघाडीचे, भाजपा, शिवसेना उमेदवार व त्यांचे अन्य पक्षांचे कार्यकर्ते हे तहसीलदार कार्यालय मध्ये दाखल झाले आहेत.





