डॉ. आंबेडकर नगर येथील लोंबकळणारे फ्यूज बॉक्सबंद

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पाठपुरावा

कुडाळ : शहरातील डॉ. आंबेडकर नगर पुतळा नजीकच्या पोलवरील लोम्बकळणाऱ्या धोकादायक फ्यूजना महावितरण कडून बॉक्स बसविण्यात आला आहे. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना पदाधिकारी आणि नागरिकांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधले होते.
मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कुडाळ शहरातील नागरिक आणि शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली महावितरण ऑफिसला भेट दिली होती. त्यावेळी डॉ आंबेडकरनगर येथील शिवसेना कार्यकर्ते भूषण कुडाळकर यांनी आंबेडकर नगर येथील मुख्य रस्त्यावरील पोलावर फ्युज लटकत असल्याने धोका निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त केली होती. त्याची तात्काळ दखल घेत महावितरणच्या माध्यमातून धोकादायक तुटलेले फ्युज बदलून त्या ठिकाणी सेफ्टी बॉक्स सहित सुसज्ज फ्युज पेटी लावण्यात आली आहे.
हे काम होण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ व शिवसेना पदाधिकारी भूषण कुडाळकर यांनी विशेष पाठपुरवठा केला. ही सेफ्टी पेटी लावण्यात आली यावेळी नगरसेवक मंदार शिरसाठ, भूषण कुडाळकर, अमित राणे, नयन चव्हाण, विनोद खन्नाळकर व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
या झालेल्या तात्काळ कामामुळे आंबेडकर नगर येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!