कुडाळ न्यायालयातर्फे बॅ नाथ पै विद्यालयात बालदिन साजरा

कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने बॅ नाथ पै विदयालय कुडाळ येथे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी बालदिनाचे शिबीर कुडाळ दिवाणी न्यायालयचे दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कुडाळ जी ए कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत करणेत आलेले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१४ नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु जे मुलांवर खूप प्रेम करायचे त्यांच्या जयंत्ती निमित्त बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम बॅ नाथ पै विदयालय कुडाळचे मुख्याध्यापक प्रेमदास राठोड यांचे अध्यक्षेतेखाली संपन्न झाला. यावेळी बॅ नाथ पै विदयालय कुडाळ संस्थेचे सदस्य यशवंत गोविद मठकर उपस्थित होते. या कार्यक्रमात वकील श्रीमती उमा सावंत यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचेविषयी माहिती दिली तसेच मुलांचे हक्क याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच वकील संजय रानडे यांनी मुलांसाठी बाल अनुकूल कायदेशीर सेवा आणि त्यांचे संरक्षण योजना याविषयी कायदेविषक माहिती दिली.
तसेच कुडाळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांनी सायबर गुन्हे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वाहतुक नियंत्रक पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी वहातुकीचे नियमांबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बॅ नाथ पै विदयालय कुडाळचे सहा शिक्षिका श्वेता कोकरे व आभार सहा शिक्षिका नुतन पिंगुळकर यांनी मानले. या कार्यक्रमात २५० ते २६० विदयार्थी व शिक्षक उपस्थतीत होते.

error: Content is protected !!