कणकवली तहसीलदार कार्यालयात इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांसाठी जुळवा जुळव

शेवटचे तीन दिवस बाकी
17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनाच मिळणार तहसीलदारांच्या कक्षात प्रवेश
प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडून देखील आढावा
कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज पासून अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून, आज शुक्रवारी उमेदवारी अर्जासोबत जोडायच्या कागदपत्रांकरिता तहसील कार्यालयात इच्छुकांची व त्यांच्या कुटुंबीयांची देखील गर्दी झाली होती. कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत आता आज व शनिवार 15 नोव्हेंबर व सोमवार 17 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत अखेरचा अखेरची मुदत असणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता इच्छुकांची उद्या शनिवारी व सोमवारी मोठी गर्दी होणार आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याकरिता एकाच वेळी अनेक अर्ज ऑनलाईन राज्यभरात दाखल होत असल्याने काही प्रमाणात दिलेली साईट स्लो चालत असली तरी तूर्तास या साईटला नामनिर्देशन पत्राची माहिती अपलोड होत आहे. अशी माहिती तहसीलदार तसा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी दिली. मात्र आज व उद्या शनिवार असला तरी देखील 15 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार आहेत . रविवारी सुट्टीचा दिवस वगळता 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत जे उमेदवारी अर्ज घेऊन उमेदवार तहसीलदार कार्यालयात दाखल होतील त्यांना तहसीलदार यांच्या कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर आलेल्या उमेदवारांना तहसीलदारांच्या कक्षात प्रवेश मिळणार नाही. अशा इच्छुक उमेदवारांची निवडणूक लढविण्याची संधी देखील हुकणार आहे. असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आज सकाळीच कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली तहसीलदार कार्यालयात भेट देत आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी पाटील उपस्थित होत्या. एकीकडे कणकवली नगरपंचायत करिता महायुती व महाविकास आघाडी यांची अंतिम नावांची जाहीर यादी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.





