आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल आयडियल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वरवडे येथे सत्राचे यशस्वी आयोजन

कणकवली/मयूर ठाकूर

ज्ञान म्हणजे प्रकाश, आणि शिक्षण म्हणजे त्या प्रकाशाचा दीपस्तंभ! आधुनिक काळात केवळ ज्ञानच नव्हे, तर आर्थिक शहाणपणही तितकेच आवश्यक आहे हाच विचार प्रत्यक्षात उतरवित, ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, वरवडे येथे नुकतेच “आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम” अंतर्गत एक प्रेरणादायी सत्र आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत आणि विद्यालयाच्या कुशल, कार्यक्षम व दूरदर्शी मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून रुचिरा सावंत मॅडम या उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत त्यांच्या सहकार्यांचाही सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्हआणि उबदार शब्दांच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचा उद्देश होता विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार करणे म्हणजेच बचत, गुंतवणूक, बजेट नियोजन आणि शेअर बाजाराचे मूलभूत ज्ञान यांची ओळख करून देणे. आजच्या गतिमान युगात पैसा कमावण्याइतकेच त्याचे योग्य नियोजन करणेही महत्त्वाचे आहे. याच संकल्पनेला मूर्त रूप देत रुचिरा सावंत यांनी अत्यंत सोप्या, समजण्यासारख्या आणि जिवंत उदाहरणांद्वारे आर्थिक नियोजनाचे धडे दिले.
या कार्यक्रमासाठी इयत्ता 5वी ते12 वी चे विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शीतल बांदल यांनी केले तर आभार हेमंत पाटकर यांनी मानले

error: Content is protected !!