पाट हायस्कूलमध्ये ज्ञानज्योती शिष्यवृत्तधारकाचा सन्मान

एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय आणि कै. सो. सि. रा. पाटील कनिष्ठ महाविद्यालय,पाट येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी-कुडाळ यांच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
ग्रामीण भागातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्लोबल फाउंडेशनतर्फे पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३६०० रुपये अशी आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. कु. तेजस्वी मेस्त्री, कु. लाडू परब, कु. कुणाल राऊळ व कु. अथर्व केसरकर, कु. मितेश तेंडोलकर या विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती मिळाली आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे. ग्लोबल फाउंडेशन पिंगुळीचे अध्यक्ष तथा पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, तानाजी काळे, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, संदीप साळसकर, पूर्वा नाईक आणि इतर शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.





