कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आघाडीच्या माध्यमातून शिंदे _ ठाकरे शिवसेना एकत्र येण्यावरून उद्धव ठाकरे नाराज?

भाजपा व शिंदे सेनेबरोबर आघाडी कदापी होणार नाही

माजी खासदार विनायक राऊत यांची माहिती

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडी मध्ये शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेना एकत्र येण्या बाबत दोन्ही शिवसेनेच्या दोन प्रमुख नेत्यांनी आज महत्त्वाची वक्तव्य केल्याने कणकवली नगरपंचायत निवडणुकीत अजून ट्विस्ट येणार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडी करता ठाकरे सेनेकडून प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट करत असा प्रस्ताव आला तरी तो स्वीकारणार नाही अशी भूमिका मांडली. तर दोन दिवसांपूर्वीच ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली होती. या बैठकीमध्ये शिंदे शिवसेनेसोबत आघाडी करण्यास उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान माजी खासदार विनायक राऊत यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपा व शिवसेना यांच्यासोबत आघाडी करायची नाही अशा स्पष्ट सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती दिली. मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रथमच अशी उघड भूमिका मांडल्याने कणकवली नगरपंचायत मध्ये होऊ घातलेल्या संभाव्य शहर विकास आघाडीमध्ये शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शहर विकास आघाडीमध्ये ठाकरे सेनेबाबत अजून कोण पक्ष सहभागी होणार? शिंदेंची शिवसेना व भाजपाची महायुती होणार का? ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!