अखेर तीवरे येथील विश्राम महाडेश्वर यांचे उपोषण आश्वासनाअंती मागे

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व जि. प. सदस्य संदेश सावंत यांनी दिले पत्र
तिवरे सरपंच रवींद्र आंबेलकर यांची यशस्वी शिष्टाई
तिवरे येथे खाजगी जमिनीमधून जलजीवन मिशनची पाईप लाईन व त्याकरिता थ्री फेज लाईन चे पोल जमिनीतून टाकल्या बाबत दोन दिवस उपोषण छेडलेल्या विश्राम महादेव म्हाडेश्वर यांचे उपोषण अखेर तिवरे सरपंच रवींद्र आंबेलकर यांच्या लेखी आश्वासना अंती मागे घेण्यात आले. सदरची दोन्ही कामे ही 30 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याबाबतचे आश्वासन तिवरे सरपंच रवींद्र उर्फ भाई आंबेलकर यांनी लेखी स्वरूपात दिले. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत यांनी या आश्वासनाचे पत्र श्री म्हाडेश्वर यांना दिल्यानंतर त्यांनी सरबत घेत उपोषण सोडले. तिवरे येथील भूमापन क्रमांक ६७६ मधून विद्युत लाईन व नळ योजनेची पाईप लाईन काढण्यासाठी श्री म्हाडेश्वर यांनी दोन दिवस आमरण उपोषण छेडले होते. यापूर्वी 27 फेब्रुवारी पर्यंत काम मार्गी लावण्याबाबत आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण थांबवले होते. परंतु दिलेल्या मुदतीमध्ये सदर आश्वासनाची पूर्तता न झाल्याने पुन्हा त्यांनी तिवरे ग्रामपंचायत समोर उपोषण सुरू केले होते. दोन दिवस दिवस रात्र उपोषण केल्यानंतर अखेर सरपंच रवींद्र आंबेलकर यांनी याबाबत तातडीने दखल घेत सदरचे उपोषण मागे घेण्याची विनंती केली. याबाबतचे पत्र श्री म्हाडेश्वर यांना देताना त्यात म्हटले आहे, संदेश सावंत, माजी जि प अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, अरुण चव्हाण, गट विकास अधिकारी पंचायत समिती कणकवली व अमित सावंत, शाखा अभियंता, ग्रा पा पु जि प उपविभाग कणकवली, सरपंच ग्रामपंचायत तिवरे रवींद्र आंबेलकर यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार उपोषणकर्त्यांच्या मागणी नुसार नळ पाणी योजनेची पाईप लाईन आपल्या भूमापन क्रमांक ६७६ मधून काढून सदर जमिनीच्या हद्दीवरून ग्रामपंचायत, संबंधित शाखा अभियंता व आपण स्वतः असे एकत्रित पाहणी करून निश्चित करणेत येईल व बदलणेत येईल.तसेच आपल्या मागणी प्रमाणे विद्युत लाईन पोलसह आपल्या हदीतुन काढण्यात येतील व सदरची दोन्ही कामे दिनांक ३० एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार ठरविण्यात आलेले आहे. असे या दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी भाजपाचे पदाधिकारी संदीप सावंत व अन्य उपस्थित होते.





