खड्डेमय झालेल्या कुडाळ मालवण रस्त्यावर शिवसेना आज बैलगाडीद्वारे करणार जनआंदोलन

शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व कुडाळ मालवण वासियांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

      कुडाळ मालवण राज्यमार्ग  सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहन चालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरून चालणे देखील नागरिकांना मुश्कील झाले आहे.वारंवार अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी होत आहेत.मात्र स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री हे सुशेगात असून कुडाळ मालवण वासिय नागरिकांच्या जीविताची त्यांना कोणतीही फिकीर नाही. त्यामुळे सुशेगात असलेल्या स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री आणि महायुती सरकारला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली  कुडाळ मालवण रस्त्यावर होबळीचा माळ येथे आज मंगळवार दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता बैलगाडीद्वारे जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी अमरसेन सावंत, श्रेया परब, राजन नाईक, हरी खोबरेकर, बबन बोभाटे, मंदार शिरसाट, मंदार ओरसकर, अतुल बंगे, कृष्णा धुरी, सचिन कदम, बाळा कोरगावकर, योगेश धुरी, वंदेश ढोलम, शिवा भोजने आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी  शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व कुडाळ मालवण वासियांनी या जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे यांनी केले आहे.
error: Content is protected !!