भाजप जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बॅक संचालक महेश सारंग यांच्या विरोधात सोशल मीडियावर खोटी मोहीम; सावंतवाडी पोलिसांत महेश सारंग यांची तक्रार दाखल


सावंतवाडी: जिल्हा बॅक संचालक तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या विरोधात काही व्यक्तींनी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून त्यांची खोटी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात महेश सारंग यांनी आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
   सध्या गेले दोन दिवस सोशल मीडियावर जिल्हा बँक फसवणुकीसंदर्भातील पत्राची प्रत व्हायरल होत असून, त्यात महेश सारंग यांनी खोटे लोन घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे या पत्रात म्हटले गेले आहे. मात्र, त्या पत्रावर ज्याचे नाव आणि सही आहे ती व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे महेश सारंग यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
    महेश सारंग यांनी सांगितले की, “काही राजकीय हेतूने प्रेरित लोक सावंतवाडी आणि कणकवली परिसरात माझ्या विरोधात नाहक अपप्रचार करत आहेत. जनतेत माझी बदनामी व्हावी यासाठी ही खोटी माहिती जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे.”
या प्रकरणी सावंतवाडी तसेच कणकवलीतील काही राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशयही महेश सारंग यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
      दरम्यान, या तक्रारीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर महेश सारंग यांची नाहक बदनामी केली जात असल्याने टिका सध्या होत आहे. सोशल मीडियावर देखील या घटनेबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत.
      आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मला हा बदनाम करण्याचा डाव असल्याचा  दावा महेश सारंग यांनी केला आहे
    “भाजपचा सिंधुदुर्गातील ओबीसी आघाडीचा दमदार चेहरा असलेले नेतृत्व “महेश सारंग” म्हणून आज परिचित आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात गेल्या काही वर्षांत भाजपने संघटनात्मक स्तरावर आपला पाया मजबूत केला आहे. या संघटनेच्या वाढीमागे काही जिद्दी आणि कार्यक्षम नेत्यांचे योगदान आहे. त्यामधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे महेश सारंग.ओबीसी समाजातील प्रभावी नेतृत्व, संघटित विचार आणि दमदार कार्यशैली यामुळे ते आज भाजपच्या जिल्हा राजकारणात ठळक स्थान मिळवून आहेत.त्यांना का बदनाम केल जातय?याची कारणे पहा.

कोण आहेत महेश सारंग? हे विस्ताराने बघूया-
संघटनातून राजकारणात उदय
    महेश सारंग यांनी आपला राजकीय प्रवास तळागाळातून सुरू केला. कार्यकर्त्यांच्या समस्या ओळखून, त्यांचे निराकरण करण्यासाठी ते नेहमी पुढे राहिले. स्थानिक पातळीवर कार्य करताना त्यांनी संघटन बळकट केले आणि लोकांच्या विश्वासाचे नाते जपले. त्यांच्या या संघटनकौशल्यामुळेच त्यांची निवड सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती म्हणून झाली. या पदावर असताना त्यांनी लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी केली आणि पंचायत समितीचे कामकाज पारदर्शकतेने पार पाडले. यामध्ये त्यांच्या आईचा राजकीय कारकीर्दीचा वारसा त्यांच्या पाठीशी लाभलेला होता.

सहकार क्षेत्रातील योगदान
    सध्या महेश सारंग हे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. सहकार क्षेत्रातील व्यवहारिक जाण, शेतकरी व व्यापारी वर्गाशी असलेला निकटचा संबंध यामुळे त्यांनी बँकेच्या कार्यात विश्वासार्हता निर्माण केली आहे. बँकिंग व्यवस्थेतील पारदर्शकता आणि शेतकरी वर्गाच्या हिताच्या धोरणांसाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

ओबीसी समाजाचा ठोस आवाज
     महेश सारंग हे भाजपचे ओबीसी समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर ते नेहमी अग्रभागी राहिले आहेत. सामाजिक न्याय, शैक्षणिक संधी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. या भूमिकेमुळे ते ओबीसी समाजाच्या विश्वासास पात्र ठरले आहेत.
    उत्कृष्ट संघटक व कार्यकर्त्यांशी नाळ
    भाजपमधील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची सवय, त्यांच्या समस्यांवर तत्काळ प्रतिसाद देण्याची वृत्ती आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता या गुणांमुळे महेश सारंग यांना पक्षांतर्गत ‘उत्कृष्ट संघटक’ म्हणून मान्यता मिळाली आहे. गावागावात फिरून पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे काम सतत सुरू असते. पक्षनिष्ठा, शिस्त आणि जनसंपर्क या तिन्ही बाबींत ते कायम सक्रिय दिसतात.
    भविष्यातील प्रबळ दावेदार
  सध्या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे. पक्ष संघटनातील अनुभव, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि मतदारसंघातील लोकप्रियता लक्षात घेता, ते भविष्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे.
    राजकीय प्रवास
     महेश सारंग यांचा प्रवास हा एक साध्या कार्यकर्त्यापासून संघटनात्मक नेतृत्वापर्यंतचा आहे. जमिनीशी जोडलेले राहून, संघटन बळकट करण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि लोकहिताचा विचार यामुळे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या ओबीसी राजकारणातील उदयोन्मुख, दमदार आणि संघटित नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हे एक जिल्हा परिषदेतील एक मोठ नेतृत्व मानल जात. संपूर्ण जिल्ह्यात महेश सारंग यांच एक राजकीय वलय आहे.
        दरम्यान यात महेश सारंग यांनी सावंतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस आता काय कारवाई करतात? याकडे पाहणे औत्सुक्यच ठरणार आहे.

error: Content is protected !!