कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकच्या वतीने खुली वक्तृत्व स्पर्धा

वाचन कलाविकास समिती त्रिंबक संचलित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक ,तालुका मालवण यांनी कै.दादा ठाकूर (आचरे-पारवाडी) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंधुदूर्ग जिल्हास्तरीय खुल्या 

(प्रौढ गट) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले असून या स्पर्धा शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९-३० वाजता जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहात घेण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे विषय
१) व्यक्तिमत्व विकासात
ग्रंथालयांचे स्थान.
२) मोबाईल ! आदर्श समाज
जीवनाचे वरदान की
शाप ?
३). ग्रामीण भागातील
युवांच्या विवाहसमस्या
आणि उपाययोजना.
वरीलपैकी कोणताही एक विषय स्पर्धकाने निवडावयाचा आहे. सादरीकरण करण्याची वेळ किमान ६ मिनिट तर कमाल ८ मिनिटे आहे.
१ जानेवारी २०२६ पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कोणताही स्पर्धक स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे
प्रथम क्रमांक – रू.२०००/-,
स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
द्वितीय क्रमांक -रू. १५००/- ,
स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
तृतीय क्रमांक- रू.१०००/- ,
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
उत्तेजनार्थ. – रु. ५००/-,
स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथम प्रवेश पत्रिका आलेल्या १५ स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धकांनी आपली नावे सहाय्यक ग्रंथपाल श्री. विवेक जाधव.मोबाईल नंबर-
९४२०७६३०१९ (व्हॉट.), ९०४९१२०६१० यांचे जवळ १४ मार्च २०२६ पर्यंत दयावीत, पण १५ स्पर्धक झाले की नोंदणी बंद केली जाईल.
सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी अध्यक्ष- श्री सुरेंद्र सिताराम सकपाळ , मोबाईल नंबर- .९४२३३०१५८४, यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर आपल्याला प्रवेश अर्ज व्हाट्सअप क्रमांकावर पाठविण्यात येईल तो भरून वेळेत पाठवावा. अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी श्री. प्रशांत मेहेंदळे यांनी दिली.

error: Content is protected !!