सौ.रिद्धी रितेश सुतार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातून जि.प सदस्य म्हणून विजयी.
कणकवली/मयूर ठाकूर
लोरे जिल्हा परिषद मतदार संघातून सौ.रिद्धी रितेश सुतार यांच्या विजयानंतर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.मित्रपरिवार,नातेवाईक,सहकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या लोरे येथील निवासस्थानी जाऊन अभिनंदन करत आहेत.निवडीनंतर लोरे गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर नागरिक मोठ्या अपेक्षेने पुढील विकासकामांकडे पाहत असून सुतार कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.नुकतेच भजनी बुवा निलेश ठाकूर,बुवा प्रवीण ठाकूर तसेच वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांचे सुपुत्र बुवा योगेश पांचाळ आणि बुवा मयूर ठाकूर यांनी लोरे येथे भेट देत सौ.रिद्धी रितेश सुतार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी त्यांनी पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या
लोरे मतदार संघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे नेतृत्व प्रभावी ठरेल,असा विश्वास व्यक्त होत असून परिसरात समाधान आणि आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे.





