संजीव कर्पे यांना राष्ट्रीय स्मार्ट व्हिलेजेस मिशनसाठी प्रकल्प देखरेख समिती सदस्य म्हणून नामांकन

कॉनबॅकचे संचालक संजीव कर्पे यांना भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) महासंचालकांनी राष्ट्रीय स्मार्ट व्हिलेजेस मिशनसाठी प्रकल्प देखरेख समितीचा सदस्य म्हणून नामांकित केले आहे.
ही मोहीम ग्रामीण भारताचे आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपाय आणि शाश्वत विकास पद्धतींद्वारे रूपांतर करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. या मोहिमेत गुजरात, लडाख, आसाम, मध्य प्रदेश, ओडिशा आणि केरळमध्ये मॉडेल स्मार्ट व्हिलेजेसचा विकास करण्याची कल्पना आहे. ज्यामध्ये CSIR-सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CBRI) ही नोडल प्रयोगशाळा असेल आणि 13 CSIR प्रयोगशाळांचा सक्रिय सहभाग असणार आहे. संजीव कर्पे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!