“कुडाळ मान्सून रन 2026” च्या रजिस्ट्रेशन लिंकचे अनावरण

आयर्नमॅन प्रमोद भोगटे यांचे पाहिले रजिस्ट्रेशन

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर तर्फे 5, 10, 16 व 21 किमीची भव्य हाफ मॅरेथॉन

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मान्सून रन तर्फे कुडाळ मान्सून रन (वर्ष तिसरे) च्या रजिस्ट्रेशन लिंकचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आयर्नमॅन (लोहपुरुष) प्रमोद भोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. या मॅरेथॉनचे हे तिसरे वर्ष असून सिंधुदुर्गासह मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, रत्नागिरी येथून धावपटू सहभागी होणार आहेत.
यावेळी डॉ. जी. टी. राणे, अजित राणे, गजानन कांदळगावकर, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. प्रशांत मडव, डॉ. जयसिंग रावराणे, रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, डॉ. अनघा बोर्डवेकर, डॉ. मिलींद बोर्डवेकर, डॉ. गिरीश बोर्डवेकर, सुजाता रासकर, डॉ. सोमनाथ परब, अमित तेंडोलकर, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. प्रणव प्रभू आदी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे ही भव्य हाफ मान्सून मॅरेथॉन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी येथून सुरुवात होणार आहे. या मॅरेथॉन ची टॅगलाइन आहे Every running step makes your heart stronger.
राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर हे गेल्या 4 वर्षापासून अतिशय कौतुकास्पद अशी रुग्णसेवा देत आहे. येथे रुग्णासाठी विविध प्रकारच्या अत्यावश्यक अशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, ज्या सुविधांसाठी आतापर्यंत रुग्णांना इतर जिल्ह्यांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये उपचारासाठी जावे लागत होते अशा सुविधा ह्या हॉस्पिटलमार्फत सुरू करण्यात आल्या आहेत.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुविधा ही गेल्या एक वर्षामध्ये सुरू होऊन या सेवेचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला आहे. ही सेवा कुडाळ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर रुग्णांसाठी एक जीवनदायी योजना ठरत आहे. तसेच हॉस्पिटलतर्फे रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात. जसे की रक्तदान शिबिर, श्रवणदोष चिकित्सा शिबिर, दंतचिकित्सा शिबिर, फिजिओथेरपी शिबिर, आंतरराष्ट्रीय योगदिन शिबिर, तसेच अॅम्ब्युलन्स सेवा अतिशय वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपल्या समाजातील सर्व घटक निरोगी व आनंददायी कसे राहतील याच्यासाठी रुग्णालयाची व त्यांच्या टीम ची खास धडपड चालू आहे. आणि त्यातूनच या मॅरेथॉनचे नियोजन 3 वर्षापूर्वी करण्यात आले. सुदृढ आरोग्य हे Healthy Nation चा पाया आहे या संकल्पनेतूनच मॅरेथॉनची सुरुवात केली आहे.
आतापर्यंत या मॅरेथॉन मध्ये जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील बऱ्याच स्पर्धकांनी भाग घेतला आहे. गेल्यावर्षी सिंधुदुर्गातील होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये ह्या स्पर्धेत सर्वात जास्त स्पर्धकांनी गर्दी जमवली होती. जवळजवळ 1,300 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना मेडल, डिजिटल सर्टिफिकेट व तसेच प्रत्येक गटामधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येते. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट देखील दिले जाणार आहे.
कुडाळ एमआयडीसी मधून निघणारी ही मॅरेथॉन नेरूर मार्गे वालावल मंदिर व पुन्हा एमआयडीसीमध्ये पोहोचेल. कोकणातल्या या निसर्गरम्य पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे टीम KMR तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरता मोबाईल क्रमांक 09421261212 वर संपर्क साधावा किंवा www.ranehospital.net या संकेतस्थळावरून नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत सामंत यांनी केले.

error: Content is protected !!