अखेर वागदे मधील “त्या” बॅनर च्या वादावर पडदा!

सरपंच संदीप सावंत यांची यशस्वी शिष्टाई
नजरचुकीने बॅनर लावल्याचे संबंधितांनी केले स्पष्ट
कणकवली मध्ये वागदे येथे महामार्गावर सातरल कासरल फाट्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर नावाच्या फलका समोर पक्षाचा बॅनर लावल्या प्रकरणी वादाचा प्रसंग घडल्यानंतर या प्रकाराची तक्रार वागदे आंबेडकर नगर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत जवळ दिली होती. त्यानंतर वागदे आंबेडकर नगर येथील सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायत मध्ये बोलावून त्यांच्यासोबत सरपंच संदीप सावंत यांनी चर्चा केली. सदरचा बॅनर हा नजरचुकीतून लावला गेला होता. त्यामुळे यामागे काही अन्य हेतू नाही असे स्पष्ट करण्यात आले. त्यावर सरपंच संदीप सावंत यांनी ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतच ही बैठक आयोजित करण्यात आली. मात्र संबंधितांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे याबाबत वादावर पडदा टाकण्यात आल्याची माहिती संदीप सावंत यांनी दिली. ग्रामस्थांनी देखील सरपंचांच्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले.




