मालवणमध्ये पाळीव कुत्री हरवली; शोधासाठी नागरिकांना आवाहन

मालवण धुरीवाडा परिसरातील रहिवासी कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा यांची “झेना” नावाची पाळीव कुत्री 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. झेना ही पॉमेरियन जातीची असून तिचे केस तांबड्या रंगाचे आहेत. साधारण एक फूट उंचीची आणि सुमारे 2 वर्षांची आहे. झेना हरवल्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून परिसरात तिचा शोध सुरू आहे. संबंधितांचा फोटो आणि व्हिडिओ क्लिप उपलब्ध करून देण्यात आली आहे. झेना कोणाला आढळल्यास कृपया तिला सुरक्षितपणे खालील पत्त्यावर आणून देण्याची विनंती करण्यात आली आहे. आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल, असेही कुटुंबीयांनी सांगितले आहे.
📍 पत्ता : धुरीवाडा, मालवण (तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क : 7506829118
नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





