हळवल मध्ये ठाकरे शिवसेनेला भगदाड

निवडणुकीच्या तोंडावर अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे केले भाजपामध्ये स्वागत
ठाकरे शिवसेनेला हळवल गावामध्ये मोठा धक्का मिळाला असून हळवल चे ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख सागर राणे ग्रामपंचायत सदस्य पूर्वा राणे, यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे हळवल गावामध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशा वेळी ओमकार मडवळ, सिद्धेश हळवलकर धनंजय मडवळ महेश राणे धोंडू तावडे प्रभाकर तांबे निखिल राणे सायली चव्हाण प्रथमेश राणे किरण राणे अमित पवार आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे शशिकांत राणे सतीश गुरव पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मण गावडे शिवा राणे लवु परब उपसरपंच प्रभाकर राणे राजेंद्र राणे दिनेश राणे आदि उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





