आशिये येथील सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी भिकाजी अस्वेकर यांचे निधन

आशिये बौद्धवाडी येथील सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी भिकाजी धोंडू अस्वेकर(वय ८२ वर्षे) यांचे निधन बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथील एका रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गुरुवारी सकाळी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ अंत्यसंस्कार येथील स्मशानभूमीत होणार आहेत.त्यांच्या दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,जावई, नातू,नात असा परिवार आहे.





