मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात शेठ. न. म.विद्यालय खारेपाटण प्रशालेचे उल्लेखनीय यश

तालुकास्तरावर पटकावला द्वितीय क्रमांक
राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण यांनी तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेमध्ये शाळेची स्वच्छता, हरित परिसर, भित्तीचित्रे, शैक्षणिक साधनसामग्रीची मांडणी, विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच एकूणच शैक्षणिक वातावरण यांचे मूल्यमापन करण्यात आले. विद्यालयाने नियोजनबद्ध प्रयत्न, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हे यश मिळवले.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण,मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शाळेचा परिसर आकर्षक व सुशोभित करण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. यावेळी तालुका स्तरावरून श्री. किशोर गवस साहेब, गटशिक्षणाधिकारी कणकवली, श्री. नारायण ओटवकर, केंद्रप्रमुख नांदगाव विभाग, श्री. गोपाळ जाधव केंद्रप्रमुख, खारेपाटण विभाग, श्री. प्रदीप श्रावणकर मुख्याध्यापक खारेपाटण केंद्र शाळा यांनी शासकीय निकषानुसार प्रशालेतील शैक्षणिक सुविधा,व कागदपत्रे यांची पाहणी केली. यावेळी प्रशालेच्या वतीने श्री अजय गुरसाळे यांनी उपस्थित मान्यवरांना इंटरऍक्टिव्ह बोर्ड च्या माध्यमातून सादरीकरण केले.
प्रशालेच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री.रघुनाथ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, विश्वस्त यांनी प्राचार्य श्री संजय सानप, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वर्षी प्रथम क्रमांक मिळवण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनीही विद्यालयाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील ओळख अधिक दृढ झाली आहे.
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.





