खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत डी टी एस ई परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

३८ विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार
कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील विद्यार्थ्यांनी ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन बारामती या संस्थेच्या वतीने सन २०२४ – २५ या शैशणिक वर्षी घेण्यात आलेल्या डायमंड टॅलेंट सर्च अर्थात (DTSE) या स्पर्धा परीक्षेत घघवीत यश संपादन केले असून या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या सभागृहात गुरुवार दी.९ ऑटोबर २०२५ रोजी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
या कार्यक्रमाला ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन या संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री गवस सर व कणकवली तालुका समन्वयक श्री गावकर सर हे प्रमुख अतिथी म्हणून ऊपस्थित राहिले होते.त्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ स्वागत करण्यात आले.तसेच या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला खारेपाटण केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक श्री मिलिंद सरकटे,श्रीम. शीतल राठोड,सहायक शिक्षिका श्रीम.आरती जोजेन,श्रीम.समीक्षा राऊत,श्रीम.दीपिका चव्हाण, श्रीम. लोके मॅडम,श्रीम.अबिदा काझी आदी मान्यवर शिक्षक वृंद उपस्थित होते.यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
ऋग्वेद फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी डी टी एस ई ही स्पर्धा परीक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. खारेपाटण जि.प.केंद्र शाळेच्या एकूण ३८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला होता. यापैकी २० विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.तर इयत्ता दुसरीचा विद्यार्थी चिरायू शेंगाळे या विद्यार्थाला रोख १००० /- रुपये रकमेचे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर उपाध्यक्ष सौ प्रियंका गुरव ग्रा.पं. सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे,समिती सदय श्री मंगेश ब्रम्हदंडे यांनी अभिनंदन केले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीम.आरती जोजेन तर आभार श्रीम.समीक्षा राऊत यांनी मानले.





