अखेर या व्यक्तीची नागवे मधील त्या घरातून कायदेशीर हकालपट्टी

नागवे उपसरपंच महेंद्र कुडाळकर यांची माहिती

एवढाच कळवळा असेल तर सुशांत नाईक यांनी त्या उपोषणकर्त्याला आपली एक सदनिका द्यावी

नागवे ग्रामपंचायत हद्दीत चुलत भावाच्या घरात बोगस कागदपत्रे सादर करून अनधिकृत नाव घालून आयत्या बिळात नागोबा होण्याचा प्रयत्न करणाऱ्या ला अखेर त्या घरातून अधिकृत हकालपट्टी ची कारवाई करण्यात आली आहे . अशी माहिती उपसरपंच महेंद्र कुडाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली .
यामध्ये त्यांनी म्हटले आहे, नागवे सरपंच उपसरपंच आणि सदस्यांवर खोटे आरोप करून बदनामी करत कारवाईची मागणी करताना जिल्हा प्रशासनाकडे खोटे अर्ज करून उपोषण करणाऱ्या प्रीतम मोरये यांना अखेर स्वतः घराबाहेर पडावं लागले .माणुसकीच्या नात्याने काही वर्ष घरात राहायला दिले त्याचा गैरफायदा घेत प्रीतम मोरये हा खोटे कागदपत्र आणि अर्ज करून ग्रामपंचायत नागवे आणि जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करत होते.सदरचा हा प्रयत्न प्रशासनाकडून फेटाळण्यात आला .
स्वतः ला खोटारडा समाजसेवक म्हणवणाऱ्या प्रीतम मोरये यांची याआधी भाजप पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच त्याचा इतिहास आणि त्याचे प्रताप संपूर्ण गावाला आणि पंचक्रोशीत चांगलाच माहिती आहे .
अशा अनधिकृत आणि बोगस कामाला पाठिंबा देणारे शिवसेना युवानेते सुशांत नाईक यांचा नागवे गावाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. दरम्यान जिथे पालकमंत्री साहेबांच नाव घेतले जाते तिथे सुशांत नाईक लगेच धाव घेतात. त्यामुळे सुशांत नाईक हे नितेश राणे साहेबांचे किती हितचिंतक आहेत हे दिसून येते. त्यांच्या हातून कोणत्याही प्रकारचे समाजकार्य होऊ शकत नाही .एव्हढेच दानशूर जर बिल्डर सुशांत नाईक असतील तर बेघर झालेल्या प्रीतम मोरये साठी आपल्याकडील 1 सदनिका नावावर करून दान करावी असे आवाहन नागवे भाजप पदाधिकाऱ्यांकडून त्यांना करण्यात येत आहे .

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!