बिबट्याची नखे व सुळे विक्री प्रकरणातील पाचही संशयीताना सशर्त जामीन मंजूर

संशयितांच्या वतीने ॲड. उमेश सावंत, ॲड. विलास परब, ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
बिबट्याची १२ नखे आणि चार सुळे विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या व वनविभागाने कारवाई केलेल्या पाचही जणांना येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजुर केला आहे.
संशयित विजय महादेव हळदिवे (रा. फोंडाघाट) याच्यावतीने ॲड. विलास परब यांनी, कृष्णात भिकाजी रेपे (रा. अक्नुर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), तौफीक अल्लाउद्दीन सनदी (रा. गळतगा, ता. चिकोडी, जि. बेळगाव), परशुराम प्रकाश बोधले (रा. नवलीहळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव) यांच्यावतीने ॲड. उमेश सावंत तर आशुतोष अनिल मेस्त्री (रा. करंजे) याच्यावतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.
कणकवलीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार ३० सप्टेंबर रोजी कणकवली- फोंडा रस्त्यावर डामरे येथे वनविभागाने केलेल्या कारवाईत एकूण १२ वाघनखे (बिबट्याची नखे) आणि चार सुळे (दात) जप्त केले होते. तसेच आरोपींकडील तीन दुचाकीही जप्त केल्या होत्या. याप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने तीन दिवस वनकोठडी देण्यात आली होती.
तपासादरम्यान, पाचवा संशयित आशुतोष मेस्त्री यालाही अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यालाही एक दिवसाची वन कोठडी दिली होती. या सर्वांच्या वनकोठडीची मुदत संपल्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यांच्यावतीने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने सर्वांची प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करताना तपासकामात ढवळाढवळ करू न्यायालयाच्या परवानगीशिवाय नये, वर शुक्रवारी वनविभागाकडे हजेरी लावावी, बाहेर जाऊन नये, अशा अटी घातल्या आहेत.
कणकवली प्रतिनिधी





