झाराप येथे गाव सभेतच ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा झटका

संजय सामंत यांचे निधन : झाराप भावई मंदिर मधील घटना

तालुक्यातील झाराप तिठा येथील संजय विनायक सामंत वय (63) रा. सामंतवाडी या ज्‍येष्‍ठ नागरिक गाव सभेतच कोसळल्याची घटना घडली. उपचाररासाठी सामंत यांना खासगी वाहनातून कुडाळ येथील सिंधू केयर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले, मात्र तेथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
झाराप गावात स्वच्छ व हरित गाव संकल्पना राबविण्यात आली आहे. राज्याची कमिटी या गावाला भेट देण्यासाठी येणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी आज झाराप भावई मंदिर येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खास गाव सभा बोलवण्यात आली होती. कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर, विस्तार अधिकारी संजय ओरोसकर, सरपंच दक्षता मेस्त्री, ग्रामसेवक सतीश साळगावकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
गावसभा सुरू झाली. काही वेळानंतर ‘ही सभा कशासाठी बोलविली हे सांगा, या आधी झालेल्या सभेत मला काही समजले नाही, सर्व परत सांगा’,अशी मागणी संजय सामंत यांनी केली. विषयावर वातावरण तापले होते. याच दरम्यान ही चर्चा सुरू असतानाच ”आपली चूक झाली, मी देवळात एवढ्या मोठया आवाजात बोलायला नकॊ होते. माझे चुकले”, असे सामंत म्हणाले. या नंतर स्वच्छ व हरित गावासाठी लागेल ते आर्थिक सहकार्य मी करतो असे बोलून ते बसत असतानाच ते अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळे गाव सभेत एकच गोंधळ उडाला. संजय सामंत बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक (BEST – बेस्ट) अधिकारी पदारून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पश्चात पत्नी, मुलगा, सून, बहीण असा मोठा परिवार आहे. झाराप पंचक्रोशीत याबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!