कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

पी. डी. शिरसाटअध्यक्ष तर महेश ओटवणेकर सचिव

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची सभा गुरुवारी गुरुवारी येथील महालक्ष्मी हॉल नं. २ मध्ये झाली. या सभेत तालुका व्यापारी संघाची नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. या कार्यकारीणीची निवड करण्यासाठी प्रसाद धडाम यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहीले व सर्वानुमते कार्यकारीणीची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष पी.डी.शिरसाट , उपाध्यक्ष संदेश पडते व गुरूप्रसाद (बाळा) कोरगावकर (माणगाव), सेक्रेटरी महेश ओटवणेकर, सहसेक्रेटरी भानुदास बांदेकर (कसाल), खजिनदार अक्षय सावंत, सहखजिनदार अनुप तेली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर द्वारकानाथ घुर्ये, संजय भोगटे, श्रीराम शिरसाट, राजन नाईक, अवधूत शिरसाट, प्रसाद धडाम, गोविंद सावंत आदी उपस्थित होते. या सभेच्या सुरूवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार व वेंगुर्ले संघटनेचे तालुकाध्यक्ष विवेक उर्फ विभा खानोलकर यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. तसेच या सभेत ओरोस येथील व्यापारी अमित भोगले हे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य झाल्याबद्दल सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या सभेत बाळा कोरगावकर, ओंकार तेली, प्रकाश वाळके, सुनील भोगटे, प्रसाद शिरसाट, सुहास बांदेकर, द्वारकानाथ घुर्ये यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीबद्दल विचार मांडले.
    नूतन अध्यक्ष पी.डी. शिरसाट यांनी संघटना मजबूत करण्यासाठी व वाढविण्यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली. या सभेत मागील कार्यकारीणीच्या जमाखर्च अहवाल सादर करण्यात आला. या सभेचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन महेश ओटवणेकर यांनी केले. या सभेला व्यापारी बंधूंची लक्षणीय उपस्थिती होती.

error: Content is protected !!