राणे समर्थक ग्रामपंचायत नागवे सरपंच, उपसरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई साठी प्रीतम मोर्ये यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भेट

कणकवली तालुक्यातील नागवे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सदस्य यावर कायदेशीर कारवाई कधी होणार या मागणीसाठी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर आज नागवे गावचे ग्रामस्थ प्रीतम मोर्ये यांनी उपोषण करीत लक्ष वेधले. सिंधुदुर्ग नगरी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर केलेल्या या उपोषणाला युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत सिद्धेश राणे, निलेश परब, रमेश राणे हे उपस्थित होते. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांची भेट घेऊन संबंधित व्यक्तींनवर कायदेशीर कारवाई करून प्रीतम मोर्ये यांना न्याय द्या अशी मागणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी योग्य to मार्गकाढून पूर्व सातबारा होता तसा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मोर्ये यांनी सांगितले की, नागवे ग्रामपंचायतचा कारभार मनमानीपणे चालला आहे याला सरपंच उपसरपंच सदस्य कारणीभूत असल्याचा आपला आरोप आहे १८ सप्टेंबर २५ रोजी माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार माझे वडीलोपार्जित घर जिथे सध्या माझी आई कायम वास्तव्यास आहे ते सदरचे घर ग्रामपंचायत यांनी आम्हाला कोणतीही माहिती न देता मुंबई येथे वास्तवात असलेल्या चुलत भावाच्या नावावर केली आहे सदर व्यक्तीने ३१ जानेवारी २०११ रोजी घर नावावर करण्याकरता अर्ज केला होता पण तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने माहिती घेऊन तो अर्ज फेटायला होता. पुन्हा सदर व्यक्तीने अर्ज केला व त्यावेळी देखील हा अर्ज फेटाळण्यात आला असे असताना १२८/ २०२४ रोजी ग्रामपंचायत नागवे मासिक सभेत २०११ सालातील अर्ज व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्राची कोणतीही पडताळणी न करता अर्ज मंजूर करून सदर घर माझे चुलत भावाच्या नावावर केले या प्रकरणाला ग्रामसेवक यांचा आक्षेप असताना देखील सरपंच उपसरपंच व चार सदस्यांच्या बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला या प्रकरणाची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली असून सदर सरपंच उपसरपंच व सदस्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला अपात्र करण्याची मागणी केली आहे जोपर्यंत सदर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!