विविध मागण्यांकरिता अशा वर्कर्स यांचे काम बंद आंदोलन

मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी दिले तहसीलदारांना निवेदन

मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स युनियनच्या वतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन छेडण्यात आले असून, विविध मागण्यांकरिता छेडण्यात आलेल्या या काम बंद आंदोलनादरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करत तहसीलदार यांना मुख्यमंत्र्यांना देण्याकरिता निवेदन देण्यात आले. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) केंद्रीय व महाराष्ट्र राज्य कमिटीच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीटू संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन, सिंधुदुर्ग जिल्हा अंशकालीन महिला आरोग्य परिचर, महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन या संघटनांचे कर्मचारी व कामगार सीटूच्या नेतृत्वाखाली काल 12 फेब्रुवारी 2026 रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलनात सहभागी झाले. यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, कामगार व कर्मचारी विरोधी चार श्रमसंहिता त्वरित रद्द करा. व्ही जी राम जी योजना रद्द करून सक्षम मनरेगा योजना पुन्हा सुरु करा. आरोग्य, शिक्षण, विमा, बँका, रेल्वे, व इतर सर्व सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण न करता त्यांना मजबूत करा.आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य सेवेत कायम करून त्यांना किमान तीस हजार रुपये मासिक वेतन सुरू करा. त्यांना बॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड व पेन्शन सुरु करा.अंशकालीन महिला आरोग्य परिचर यांना पूर्णवेळ सेवेत कायम करून किमान तीस हजार रुपये मासिक वेतन सुरू करा. त्यांना ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड व पेन्शन सुरु करा. वैद्यकीय प्रतिनिधींना संरक्षण देणारा सेल्स प्रमोशन एम्पलॉई ऍक्ट 1976 पुन्हा लागू करा. विक्री प्रतिनिधीना कामकाजाबाबत योग्य नियम करा. शासकीय रुग्णालय व संस्थांमध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना असलेली प्रवेश बंदी रद्द करून त्यांना कामाचा हक्क प्रदान करा.असंघटित शालेय पोषण आहार कामगार, रुग्णवाहिका चालक, अंगणवाडी कर्मचारी यांना सेवेत कायम करून, किमान वेतन काय‌द्यानुसार मासिक 30 हजार रुपये वेतन सुरु करा. त्यांना ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड व पेन्शन या सामाजिक सुरक्षा योजना सुरु करा. अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.
error: Content is protected !!