भूमी अभिलेख विभागाचे १८ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन

जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षकांना दिले निवेदन

भूमी अभिलेख विभागातील सर्व कर्मचारी येत्या १८ फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन करणार आहेत. त्याबाबतची सूचना मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जमाबंदी भूमी अभिलेख आयुक्त, तसेच इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या नोटिसीची प्रत सिंधुदुर्ग जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने उपसंचालक तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तृप्ती घोडमिसे आणि व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग सुजितकुमार जाधोर यांना देण्यात आली.
भूमी अभिलेख विभागातील महारास्ट्र राज्यातील कर्मचारी यांचे प्रश्न अनेक वर्षे शासन दरबारी प्रलंबित राहिलेले आहेत. त्यासाठी कर्मचारी संघटना, पदाधिकारी यांनी वेळोवेळी खाते प्रमुख व महाराष्ट्र शासन यांच्याकडे अर्ज विनंती निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत. परंतु शासनाकडून त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. तसेच माननीय जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे बैठका घेऊन कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मांडलेले आहेत. तसेच त्या बाबत वेळोवेळी निवेदन सादर केलेली आहेत. परंतु खाते प्रमुख यांचे कडूनही दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून आता महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील प्रमुख पदाधिकारी यांनी पुणे येथे एकत्र येऊन एका कृती समितीची स्थापना केलेली आहे. या कृती समितीत सर्व विभागातील पदाधिकारी एका झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत. त्यांनी कृती समितीच्या माध्यमातून ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ना.चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. दिवसे साहेब जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख पुणे महाराष्ट्र राज्य व इतर संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी यांना दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ पासून पुकारण्यात आलेल्या काम बंद आंदोलनाची नोटीस दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेली आहे.
त्याची प्रत माहितीसाठी पदसिद्ध उपसंचालक तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तृप्ती घोडमिसे आणि व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग सुजितकुमार जाधोर यांना सादर केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटना अध्यक्ष नरसु बाबू रेडकर, कार्यकारिणी सदस्य एस.आर पार्टे. एम. ए. सरमळकर, अय्याज शेख, श्रीमती अश्विनी गावडे उपस्थित होते.

error: Content is protected !!