श्री वारणा शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यालय तळगाव व कोकण मिलिटरी स्कूल तळगाव या विद्यालयांचे वार्षिक पारितोषिक वितरण स्नेहसंमेलन सोहळा 15फेब्रुवारी रोजी

रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता श्री वारणा शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यालय तळगाव व कोकण मिलिटरी स्कूल तळगाव या विद्यालयांचे वार्षिक पारितोषिक वितरण स्नेहसंमेलन सोहळा तळगाव (ता. राजापूर) या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजापूरचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले हे उपस्थित राहणार असून वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न होणार आहे.
सुवर्ण महोत्सवी वाटचाल करणाऱ्या वारणा शिक्षण संस्थेमध्ये प्राथमिक पासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचे शिक्षण व निवासी शिक्षण देणारे संकुल आहे.पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांबरोबरच कोकणातील तळगाव या ठिकाणी हे निवासी शिक्षण देणारे संकुल म्हणून विकसित होत आहे. गेल्या पंचवीस वर्षाच्या माध्यमिक विद्यालय तळगावच्या वाटचालीत अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित झाले असून देश आणि विदेशात विविध ठिकाणी कार्यरत आहेत.
वर्षभरात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ याबरोबरच विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कलाविष्कार यावेळी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व पालक विद्यार्थी व परिसरातील शिक्षण प्रेमी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माध्यमिक विद्यालय तळगावचे मुख्याध्यापकांनी केले आहे.

error: Content is protected !!