बांव प्रीमियर लीगला दिमाखात सुरुवात

बांव प्रीमियर लीगमधून नवा आदर्श ! : माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांचे प्रतिपादन

कुडाळ : भारतीय जनता पार्टी, बांव पुरस्कृत, सचिन स्पोर्ट आयोजित बांव प्रीमिअर लीग २०२३ भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज दिमाखात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजप ज्येष्ठ पदाधिकारी रणजीत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा सुरबाची वाडी-डोंगरतळी- बांव येथे आज १ एप्रिल २०२३ ते ३ एप्रिल २०२३ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रोख रुपये २५ हजार आणि आकर्षक चषक तसेच द्वितीय पारितोषिक रोख रुपये १५ हजार आणि आकर्षक आणि इतर आकर्षक पारितोषिके आहेत. या स्पर्धेमध्ये बांव, बांबुळी, सोनवडे, पावशी, आंबडपाल, पणदूर, अणाव, डिगस येथील संघ सहभागी झाले आहेत.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई म्हणाले की, बांव प्रीमियर लीगमधून नवा आदर्श निर्माण झाला असून या स्पर्धेचे शिस्तबद्ध आयोजन आहे. अशा स्पर्धांमधून आपल्या स्थानिक गावातील खेळाडूंना प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. क्रिकेट केवळ खेळ म्हणून बघू नका, त्यातून करिअर घडवा, असा कानमंत्र देसाई यांनी देताना आज आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडू कोटी रुपये मिळवितात. त्याप्रमाणे आपल्या भागातील खेळाडूंनी मेहनत करून आपले करिअर घडवावे, असे मार्गदर्शन केले.
या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी युवा मोर्चा ओरोस मंडलचे श्रीपाद (पप्या) तवटे, युवा मोर्चा ओरोस मंडल योगेश चिंचाळकर, पावशी शक्ती केंद्रप्रमुख आणि बांव माजी सरपंच नागेश परब, शक्ती केंद्रप्रमुख पावशी रूणाल कुंभार, बांव बुथ अध्यक्ष आणि माजी उपसरपंच सुनील वेंगुर्लेकर, बांबुळी सरपंच प्रशांत परब, सोनवडे माजी उपसरपंच आणि बुथ अध्यक्ष सुधीर धुरी, ग्रा. प. सदस्य प्रमोद कदम, शिवसेना उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर, सानिका परब, सविता सुतार, माजी सरपंच वर्षा गावकर, माजी ग्रा. प. सदस्य संतोष मेस्री, प्रमोद परब, आनंद परब, ओमकार सातार्डेकर, मिलिंद वेंगुर्लेकर, उमेश वेंगुर्लेकर, सुरज करलकर, अभय कदम, विजय गावकर, लक्ष्मण नेवाळकर, विराज बावकर, सत्यवान परब, सखाराम परब, रवींद्र नेवाळकर, मयूर मेस्त्री, योगेश कांबळे, वामन सारंग, वैभव परब, अभिषेक सावंत, यशवंत परब, बाळाजी परब, योगेश परब, प्रदीप परब, शेखर नेवाळकर, संजय परब, रोहित परब, दशरथ बावकर, शेखर बावकर, अरुण बावकर, मधुकर कांबळे, सखाराम सुतार, मयुरेश जाधव, सिद्धेश परब, हेमंत हडकर, संदेश नेवाळकर, सचिन मेस्त्री आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!