चक्रीवादळ नुकसानीची माजी आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी

शिवसेना ठाकरे सेनेच्या वतीने आर्थिक मदत

कुडाळ : तालुक्यातील निवजे गावाला मंगळवारी सकाळी चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. अचानक झालेल्या या वादळाने ग्रामस्थांच्या घरांची, गोठ्यांची छप्परे उडाली, कौले व पत्रे फुटून गेले, माड, केळींसह फळझाडे देखील उन्मळून पडली. भातशेतीही जमीनदोस्त झाली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी सायंकाळी निवजे गावात भेट देत नुकसानीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांना धीर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी शिवसेना माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, निवजे सरपंच महेंद्र पिंगुळकर, उपसरपंच पूजा पालव, युवासेना शाखाप्रमुख राम पालव, प्रथमेश शिंदे, बाबी जाधव, सौरभ राऊळ, पिंट्या राऊळ, महादेव राऊळ, उमेश घाडी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!